आमच्याबद्दल

 

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे.  वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.

यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

‘तरुण भारत’ प्रथम नागपुरात सुरु झाले. राष्ट्रीय विचाराचा पाठपुरावा करण्याचे व्रत घेऊन हे वृत्तपत्र सुरु झाले.  पुढे पुणे येथे ‘तरुण भारत’ने पदार्पण केले. विस्ताराची ही यात्रा अशीच सुरु आहे . मुंबई, पुणे सोलापूर असा प्रवास झाला. उतार-चढ , अपयश-यश सगळे या यात्रेत अनुभवले.  ठिकठिकाणच्या संस्थांनी ‘तरुण भारत’ला चोखंदळ वाचकांच्या हाती देणे सुरु ठेवले आहे.

‘तरुण भारत’ हे केवळ एक दैनिक नसून ती एक समग्र विचारधारा आहे, एक अभियान आहे.

हिंदु अस्मितेला सर्वोच्च प्राधान्य देणारे, धर्म हेच दैवत मानणारे, समाजात सर्वदूर स्नेहभाव, समरसता आणि सौजन्य निर्माण व्हावे असा ध्यास असणारे, विज्ञान आणि अध्यात्माच्या पायावर समाज परमवैभवाला जावा असे ध्येय असणारे हे अभियान आहे. आपणही या अभियानाचे अंग बनावेत आणि इतरांना ही या धर्मकार्यात सहभागी करावे  हीच अपेक्षा!

वंदे मातरम 

-विवेक घळसासी

अध्यक्ष, सोलापूर तरुण भारत मिडिया लि. सोलापूर.